Monday, January 10, 2011

सृष्टी तुला वाहुनी धन्य माते

रोज रात्री मुलांना झोपवताना आम्ही मराठी कविता/गाणी म्हणतो. त्यातलीच ही एक कविता - मी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात होती. बहुधा ना. वा. टिळकांची आहे. माझ्या पाच वर्षांच्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलाला या कवितेचा अर्थ कळत असेल असं मला अजिबात वाटत नाही. पण आज सकाळी सकाळी तो मला म्हणाला, "आई, ती कविता आहे ना, माते महात्मे असलेली, ती खूप relaxing आहे." मला गम्मत वाटली. त्याबरोबरच, ही कविता (आणि अशा अनेक कविता) अतिशय सुंदर पद्धतीने शिकवणाऱ्या चौबळ बाई आठवल्या. त्यांना माझा नमस्कार!

सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रुपसंपन्न तू निस्तुला
तू कामधेनू खरी कल्पवल्ली सदा लोभला लोक सारा तुला
या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

माते महात्मे तुझे तत्ववेत्ते तुझे शूर योद्धे तुझे सत्कवी
श्रेणी त्यांची सदा माझिया गे मना पूजनी आपुल्या वाकवी
त्यांची यशे ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती धेय्य ते गे जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

तूझ्या महोदार सारस्वताच्या महासागारीचा जरी मीन मी
झालो तरी गे तृषा मन्मनाची कधीही कधीही न होणे कमी
आई गुरूस्थान अंती जगाचे तुझे यात शंका न काही जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

वारा तुझ्या स्पर्शने शुद्ध झाला मला लाधला भाग्य हे केवढे
माते स्वये देशी जे अन्नपाणी सुधा बापुडी कायशी त्यापुढे
तू बाळगीशी मला स्कंधी अंकी सुखाची खरी हीच सीमा पुरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

3 Comments:

Anonymous Anonymous said...

Great. But nothing like listening to it from the blogger who (finally) blogged it. I am fortunate, am I not?

3:37 PM  
Blogger Kohum said...

अतिशय सुंदर कविता ! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्हाला आणि हे आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केदारला धन्यवाद.

मला माझी आईने ह्या कवितेची चाल शिकवली होती आणि ती चाल आता माझ्या डोक्यात घोळतेय.

ता.क. -- मुलांना झोपवताना मराठी गाणी म्हणायची प्रथा छान आहे.

11:17 AM  
Blogger Deepa said...

धन्यवाद!

3:53 PM  

Post a Comment

<< Home